अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात

टीम इ सकाळ
रविवार, 2 जुलै 2017

पुणे : मुरांबा, दिल दोस्ती दुनियादारी आदी सिनेमा नाटक, मालिकेतून झळकलेला अभिनेता अमेय वाघ आज 2 जुलैला विवाहबंधनात अडकला. त्याची गेल्या 13 वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या साजिरीशी त्याने ही लगीनगाठ बांधली. 

आपण लवकरच लग्न करणार असल्याची माहीती त्याने सोशल साईटवरूनच दिली होती. आपली ती खूपच चांगली मैत्रीण असून गेल्या 13 वर्षांपासून ती हे नाते चांगले सांभाळते आहे. म्हणूनच आपण हा निर्णय घेतल्याची माहीती त्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. रविवारचा मुहूर्त पकडून अमेय आणि साजिरी यांनी लग्नगाठ बांधली. 

सिने, नाट्यसृष्टीतील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखक, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन याने सोशल साईटवर फोटो टाकून ही बातमी सर्वांना दिली. 

Web Title: amey vagh weds sajiri esakal news