
इराने आपल्यावर १४ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असे धक्कादायक विधान केले आहे. ती म्हणाली, अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता.
मुंबई - लहान असताना आमीर खानची मुलगी हिला नैराश्याने ग्रासले असल्याची माहिती तिने यापूर्वी दिली होती. आपण त्या संकटातून कशाप्रकारे बाहेर आलो याबद्दलची एक पोस्टही तिने सोशल मीडियावर शेयर केली होती. आमीर खानच्या मुलीने अशाप्रकारच्या मानसिक संकटातून जाणे कदाचित त्याच्या चाहत्यांना अपेक्षित नव्हते. त्यांनी त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता इरा खानने लहानपणी आपण घराबाहेर न पडण्याचे कारण सोशल मीडियावर सांगितले आहे.
आपल्या पोस्टमुळे इरा चर्चेत आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना इरा म्हणाली, “मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते.इराने ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिने कधीकाळी नैराश्यामध्ये होती असं या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. परंतु इतक्या श्रीमंत घरात जन्माला आलेली इरा नैराश्येमध्ये का होती? त्याचे उत्तर तिने दिलं आहे.
इराने आपल्यावर १४ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असे धक्कादायक विधान केले आहे. ती म्हणाली, अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळायची.
'कुठल्या धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले' ? हा प्रश्न अमिताभ यांना पडला महागात
मी दिवसांतील बराच काळ झोपून असायचे. मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. परिणामी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.”असा अनुभव इराने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.