बधाई हो! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

बिग बी अमिताभ आणि जया बच्चन यांनी आपलं यशस्वी सहजीवन साजरं करत अनेकांसाठी फॅमिली गोल्स आणि कपल्स गोल्स सेट केलेत. अमिताभ यांच्या 'जंजीर' या पहिल्या यशस्वी चित्रपटानंतर जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

सिलसिला, चुपके-चुपके, मिली, अभिमान यांसारख्या असंख्य चित्रपटात अमिताभ- जया बच्चन यांनी एकत्र काम केले. आजही हे बॉलीवूडमधील सगळ्यात यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जाते. अमिताभ आणि जया बच्चन यांनी त्यांचा 45 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. इतक्‍या आनंदाच्या क्षणी बिग बींनी ट्विटरवर त्यांचा आणि जया बच्चन यांचा एक जुना फोटो शेअर करून ज्यांनी त्यांना 45 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार मानले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bacchan and jaya bacchan celebrates their 45th marriage anniversary