"बदला'मध्ये बिग बी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चित्रपटाची सिनेरसिक आवर्जून वाट पाहत असतात. नुकतेच आपण त्यांना "पिंक'मध्ये पाहिले. पीडित तरुणीला न्याय मिळवून देणारा रिटायर्ड जज त्यांनी समर्थपणे साकारला होता. बिग बी आता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "बदला' चित्रपटात काम करणार आहेत. "बदला'चे कास्टिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. सुरुवातीला त्यातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता संजय दत्तचे नाव निश्‍चित झाल्याची चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच अमिताभना चित्रपटाची कथा ऐकविली. त्यांना ती खूप आवडली अन्‌ त्यात अभिनय करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. 

खरे तर सिद्धार्थ आनंद काही दिवसांपासून संजयच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होते. गेल्या वर्षीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली जाणार होती; पण अनेकदा बदल झाल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. "बदला' चित्रपटाची कथा संजयला आवडली नसल्याचे बोलले जात आहे. त्या चित्रपटातून संजय बाहेर पडला असून, तो "भूमी'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. "बदला'ची कथा एक वयोवृद्ध पुरुष व तरुणीवर आधारित आहे. चित्रपटाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: amitabh bacchan upcoming film