अमिताभ बच्चन-आयुष्मानची मजेशीर जुगलबंदी, 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर सोशल मीडियावर ठरतोय हिट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शूजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट हलका फुलका असा विनोदीपट आहे. अमेझॉन प्राईमच्या अधिकृत ट्विटर अकऊंटवर 'भेटा मिर्झा आणि बंकीला' असं म्हणत त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये मिर्झा आणि बंकीची नोकझोक दाखवण्यात आली आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बी टाऊनमध्ये आणि सोशल मीडियावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुष्मान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटाची बरीच चर्चा होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शूजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट हलका फुलका असा विनोदीपट आहे. अमेझॉन प्राईमच्या अधिकृत ट्विटर अकऊंटवर 'भेटा मिर्झा आणि बंकीला' असं म्हणत त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये मिर्झा आणि बंकीची नोकझोक दाखवण्यात आली आहे.

हे ही वाचा - जुहीची शेतकऱ्यांना मदत, शेतकऱ्यांना दिली स्वतःची जमीन

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे आयुष्मानने एका भाडेकरूची भूमिका साकारली आहे. ट्रेलरची सुरवात आयुष्मानच्या चिडचिडीने होते. आयुष्मान लखनऊच्या एका हवेलीत भाडेकरू म्हणून राहत असतो. आणि या हवेलीचे मालक असतात अमिताभ बच्चन. त्यांना आयुष्मान अजिबात आवडत नसतो. त्याला हवेलीतून बाहेर काढण्यासाठी ते बरेच प्रयत्न करत असतात. पण आयुष्मान त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवतो. 

यावरून या दोघांचे सारखे वाद होत असतात. त्यानंतर या दोघांचे हे वाद इतके वाढतात की हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहचत. हा ट्रेलर पाहताना तुम्हाला नव्वदीच्या दशकातील टॉम अँड जेरी हे कार्टून नक्कीच आठवेल. या ट्रेलरमध्ये दोन तगड्या कलाकारांना एकत्र पाहणं कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नाही. ही अगदी साधी-सरळ कथा मजेशीर रित्या या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शिवाय अमिताभ यांचा या चित्रपटामधील विशेष लक्षवेधी ठरत आहे. 

Ayushmann Khurrana Drops Gulabo Sitabo Trailer - Social News XYZ

'गुलाबो सिताबो' हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. आधी हा चित्रपट 12 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व चित्रपटांचे प्रदर्शन रखडले. त्यामुळे 'गुलाबो सिताबो'च्या टीमने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट १२ जून रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

amitabh bachchan and ayushman khurrana gulabo sitabo movie trailer release


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan and ayushman khurrana gulabo sitabo movie trailer release