अमिताभ बच्चन बनले अवयवदाता, चाहते म्हणाले 'तुम्हाला तर हेपॅटायटिस आहे'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 30 September 2020

अमिताभ यांनी असं ट्विट केलं आहे की त्यांनी त्यांचं शरिर दान केलं आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई- बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकांचे आदर्श आहेत. ते सोशल मिडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. अनेकदा ते असे मेसेज आणि उदाहरणं शेअर करत असतात ज्यामुळे लोकांना भरपूर काही शिकायला मिळतं. आता अमिताभ यांनी असं ट्विट केलं आहे की त्यांनी त्यांचं शरिर दान केलं आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा: हजारो स्थलांतरित मजुरांची मदत करुन अभिनेता सोनू सूद ठरलाय 'हा' पुरस्कार मिळवणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'मी अंगदान कर्ता असल्याची थपश घेतली आहे. मी याच्या पावित्र्याची हिरवी रीबीन घालत आहे.' या कॅप्शनसोबत त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनी हिरवी रीबीन कोटला लावलेली दिसून येतेय. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

एकाने लिहिलंय, 'सर तुम्हाला तर हेपॅटायटिस बी आहे.  तुमचं शरिर कोणा दुस-याला ट्रांसप्लांट केलं जाऊ शकत नाही. सोबतंच तुमचं लीव्हर देखील ट्रांसप्लांट केलेलं आहे आणि तुम्ही रोगप्रतिकारक औषधांवर आहात. मी तुमच्या अवयव दान करुन आयुष्य वाचवण्याच्या इच्छेचं कौतुक करतो मात्र माफ करा तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या अवयवदाता होऊ शकत नाहीत. जनजागृतीबद्दल धन्यवाद सर.'

Capture

या ट्विटवर उत्तर देण्यासाठी आणखी एक ट्विट आहे ज्यामध्ये उत्तर देत म्हटलंय, ते डोळे, किडनी, हृदय दान करु शकतात तेव्हा हा मुर्खपणा थांबवा, निदान त्यांचा मेसेज तरी चांगला आहे.   

Capture2

amitabh bachchan became organ donor look how his fans react  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan became organ donor look how his fans react