अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगला १२ वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर स्वतःचे ईमोजी शेअर करत केलं सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

जगभरातील असंख्य लोक बिग बी अमिताभ यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या ब्लॉग्सला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. बिग बींसाठी हा दिवस फारच खास आहे. कारण त्यांच्या या ब्लॉग्सला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बी आपले विचार मांडत असतात. बिग बी नेहमीच वेगवेगळे ब्लॉग्स लिहीत असतात. जगभरातील असंख्य लोक त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या या ब्लॉग्सला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. बिग बींसाठी हा दिवस फारच खास आहे. कारण त्यांच्या या ब्लॉग्सला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

हे ही वाचा: 'महाभारत'मध्ये द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार होती जुही चावला मात्र 'या' कारणामुळे दिला नकार

बिग बी यांनी हा आनंद त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. आणि हे सेलिब्रेशन बिग बी सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने करत आहेत. बिग बींनी आपले स्वतःचे ईमोजी बनवले आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत हा आनंद साजरा केला आहे. 

इंस्टाग्रामवर आणि ट्वीटरवर आपल्या ईमोजीचा कॉलाज बनवून त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यावरील एका फोटोवर त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'आज माझ्या ब्लॉग्सला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. १७ एप्रिल २००८ साली मी ब्लॉग्स लिहिण्यास सुरवात केली होती. आज त्यांचा ४४२४ वा दिवस आहे. म्हणजे आज माझा ब्लॉग लिहिण्याचा चार हजार चारशे चोवीस वा दिवस आहे. ब्लॉग लिहिण्यास मी एकही दिवस चुकवत नाही. यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं.'

आणि दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचे भरपूर ईमोजीचे कॉलाज बनवून तो फोटो शेअर केला आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाप्रमाणे अनेक लोक त्यांचे ब्लॉगही पसंत करतात. ते सोशल मीडियावर ब्लॉग लिहून आपला बराचसा वेळ घालवता असतात. त्यांचा प्रत्येक ब्लॉग नेहमीच व्हायरल होत असतो. बिग बींचा ब्लॉग म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 

amitabh bachchan completes 12 years of writing his blog  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan completes 12 years of writing his blog