अमिताभ यांनी coronavirus वर केलं असं ट्वीट की काही वेळातंच करावं लागलं डिलीट..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलंय..बच्चन यांनी या ट्वीटसोबत त्यांचा एक फोटो देखील शेअर केला होता..आणि त्या कॅप्शनसोबत तीन प्रश्नचिन्ह देखील दिले होते..

मुंबई-  बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलंय..बिग बी यांनी या ट्वीटमध्ये दावा केला होता की, रविवारी जनता कर्फ्यु दरम्यान टाळ्या आणि शंखनादामुळे होणा-या ध्वनी कंपनामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईल कारण हा अमावस्येचा दिवस आहे' असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं..

मोठी बातमी- महाराष्ट्रात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्याविषयीचं संकट लक्षात घेऊन आवश्यक सेवा प्रदान करणा-या  कोरोना योद्धांसाठी आभार प्रदर्शन करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा सल्ला दिला होता.. याचा चुकीचा अर्थ काढून याविषयीच्या फेक बातम्या पसरवण्यात आल्या..याच साखळीत अमिताभ बच्चन यांचं ट्वीट समोर आलं..

Image result for amitabh tweet on corona delet

अमिताभ बच्चन यांनी आता त्याचं हे ट्वीट डिलीट केलं आहे..यात ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, 'एक सल्ला दिला होता की २२ मार्चला संध्याकाळी ५ वाजता  अमावस्येच्या दिवशी व्हायरस बॅक्टेरियाची वाईट ताकद आपल्या चामडीवर असते..शंखनाद केल्याने त्या ध्वनी कंपनांनी व्हारसचा प्रभाव कमी होतो, नष्ट होतो कारण चंद्र नवीन नक्षत्र रेवतीकडे प्रस्थान करतो...'

Image result for amitabh tweet on corona delet

बच्चन यांनी या ट्वीटसोबत त्यांचा एक फोटो देखील शेअर केला होता..आणि त्या कॅप्शनसोबत तीन प्रश्नचिन्ह देखील दिले होते..बिग बी यांच्या या ट्वीटने अनेक लोक आश्चर्यचकित झाले की बिग बी त्यांचं मत मांडत आहेत की सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या मतावर प्रश्न विचारत आहेत? 

तर दुसरीकडे सोशल मिडिया युजर्सनी बिग बींनी असं विधान पोस्ट केल्यामुळे त्यावर चर्चा सुरु केली आहे..सगळ्यात आधी गीतकार वरुण ग्रोवर यांनी बिग बींच्या या विधानावर चर्चा करत अशा कठीण परिस्थितीत अभिनेत्यांनी आणखी जबाबदारीने वागलं पाहिजे असं म्हटलंय..

हे ही वाचा: होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही 'तो' तीन तास रस्त्यावर

मुंबई कोरोनामुळे आज आणखी एका नागरिकाचा मृत्यु झालाय..६५ वर्षीय पुरुषाला खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने २३ मार्चला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.सदर व्यक्ती दुबईहून १५ तारखेला अहमदाबादमध्ये आली होती..२० तारखेला सदर व्यक्ती मुंबईत आला होता..

amitabh bachchan delets his tweet after conrtrovesy start over coronavirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan delets his tweet after conrtrovesy start over coronavirus