नागराज मंजुळेंच्या चित्रपटात अमिताभ?

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्विटर अकाउंटवरून मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले होते. सैराट या चित्रपटाला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता.

मुंबई - 'फँड्री', 'सैराट' या चित्रपटांतून सामाजिक संदेश देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविल्यानंतर नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक मंजुळे असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नसून, कथेवर काम करण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्विटर अकाउंटवरून मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले होते. सैराट या चित्रपटाला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचे सर्व विक्रम सैराटने मोडीत काढले आहेत.

Web Title: Amitabh Bachchan to do Nagraj Manjule’s next film?