अमिताभ यांच्यासाठी एका अज्ञाताने लिहिलं 'कोविडने तुमचा मृत्यु झाला पाहिजे', मग बिग बींनी असं दिलं उत्तर..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
मंगळवार, 28 जुलै 2020

बिग बींचे चाहते आणि त्यांच्या जवळच्या व्यक्ती ते लवकर बरे होऊन यावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र यात काही लोक असे देखील आहेत जे या परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्यासाठी वाईट विचार करत आहेत.

मुंबई- बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सद्यपरिस्थितीत प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे. अमिताभ ११ जुलै पासून कोरोना व्हायरस या संसर्गाशी सामना करत आहेत. या दरम्यान बिग बींचे चाहते आणि त्यांच्या जवळच्या व्यक्ती ते यातून लवकर बरे होऊन यावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र यात काही लोक असे देखील आहेत जे या परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्यासाठी वाईट विचार करत आहेत. अशा लोकांवर आता अमिताभ यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.

हे ही वाचा: प्रियांकाच्या घरी आला नवा पाहुणा, जोनास कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

एका अज्ञात व्यक्तीने अमिताभ यांच्यासाठी म्हटलं होतं की माझी इच्छा आहे की तुमचा कोविडने मृत्यु व्हावा. याबाबतची माहिती अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमधून दिली आहे. असे शब्द वापरणा-यांवर अमिताभ यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. अमिताभ सध्या कोविडवर उपचार घेण्यासाठी नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. यादरम्यान ते सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह आहेत.तसंच या परिस्थितीतही चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ते दररोज पोस्ट देखील करत आहेत. 

अमिताभ यांनी एक ब्लॉग लिहिला आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मृत्युविषयी बोलणा-यावर राग व्यक्त केला आहे. बिग यांनी लिहिलंय, 'मिस्टर अज्ञात तुम्ही तुमच्या बापाचं नाव देखील लिहिलेलं नाही कारण तुम्हाला नाही माहित की तुमचा बाप कोण आहे. इथे दोन गोष्टी घडू शकतात. एकतर मी जीवंत राहीन किंवा मरेन. जर मी मेलो तर तुम्ही एका सेलिब्रिटीच्या नावावर तुमचा राग काढणं, निंदा करणं यासारख्या गोष्टी यापुढे करु शकणार नाही.'

बिग बी पुढे लिहितात, 'दुःख आहे की तुम्ही लिहिलेलं हे लक्षात आणून देणारा तेव्हा नसेल. कारण ज्या अमिताभवर तुम्ही नजर टाकली आहे तो तेव्हा जिवंत नसेल. मात्र देवाच्या आशिर्वादाने जर मी जिवंत राहिलो तर तुम्ही लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावर राग झेलाल. केवळ माझ्याकडून नाही तर माझ्या नऊ कोटी फॉलोअर्सकडून देखील. आणि हे लक्षात ठेवा की ते जगभरात आहेत. प्रत्येक कोप-यात. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत. आणि हे केवळ माझ्या पेजममुळे निर्माण झालेलं विस्तारित कुटुंब नाही तर संहार कुटुंब आहे. मला फक्त हेच म्हणायचं आहे की 'ठोक दे साले को'  

amitabh bachchan gives a befitting reply to a troll who wishes to see him dead by covid  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan gives a befitting reply to a troll who wishes to see him dead by covid