esakal | शेहनशाहने केली कोरोनावर मात; अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh_Bachchan1.jpg

बॉलिवुडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा कोविड-19 अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शेहनशाहने केली कोरोनावर मात; अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे -

मुंबई ः महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. अमितभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे आज दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वीस दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. आपल्या जुहू येथील जलसा बंगल्यावर ते पोहोचले आहेत. मात्र अभिषेक बच्चन अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूची गरजू विद्यार्थिनीला विशेष मदत...

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ११ जुलै रोजी विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चारेक दिवसांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण

२७ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट केले आहे, की  माझ्या वडिलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरी विश्रांती करतील. तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.   

---------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image
go to top