
Amitabh Bachchan: कसे आहेत अमिताभ? कधी करणार पुन्हा शूटला सुरुवात?, स्वतःच हेल्थ अपडेट देत म्हणाले..
Amitabh Bachchan Health Update: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित स्वतःची हेल्थ अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे.
'प्रोजेक्ट के' सिनेमातील एक अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ खूप जखमी झाले होते. अमिताभ बच्चन यांचे वय आता ८० वर्षाचे आहे आणि 'ब्रह्मास्त्र' नंतर आता ते 'प्रोजेक्ट के' मध्ये अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.
बिग बी यांनी ब्लॉग मध्ये लिहिलं आहे की,''मला झालेल्या अपघाताविषयी ज्या ज्या लोकांनी चिंता व्यक्त केली,माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे मी आभार मानेन. ज्या पद्धतीनं तुम्ही सर्व माझ्यासाठी हळवे होता हे पाहून मी खरंच खूप भावूक झालो आहे. आता पहिल्यापेक्षा मी खूप बरा आहे. अजून पूर्णपणे ठीक व्हायला वेळ लागेल. डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे त्याचे मी खूप काटेकोरपणे पालन करत आहे''.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे,''अजून काही दिवस आराम करायचा आहे, छातीवर स्ट्रॅप बांधून रहायचंय..सगळं काम ठप्पं झालं आहे..आता पुन्हा काम तेव्हाच सुरू होईल जेव्हा माझी परिस्थिती थोडी सुधारेल. आणि डॉक्टर मला परवानगी देतील. पण तुम्हा सगळ्याचे मनापासून आभार''.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील होळीच्या पूजेविषयी देखील सांगितले आहे. त्यांनी लिहिलं आहे की- ''काल रात्री 'जलसा' वर होळी पेटवली गेली. होळी नेमकी कधी आहे यासंदर्भात तारखेवरनं अगदी शेवटपर्यंत कन्फ्यूजन होतं''.
हेही वाचा: परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
प्रभास,दीपिका पदूकोण आणि अमिताभ बच्चन अभिनित 'प्रोजेक्ट के' एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे ज्यात जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स पहायला मिळणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमाचं बजेट ५०० करोडच्या आसपास आहे. सिनेमाचे काही पोस्टर्स रिलीज केले गेले आहेत. पण अद्याप सिनेमातील स्टार्सचे लूक मात्र रिव्हील करण्यात आलेले नाहीत.