ईराणी डान्सरवर होतं बच्चन यांचं प्रेम, रेखावरही उचलला होता हात

ईराणी डान्सरवर होतं बच्चन यांचं प्रेम, रेखावरही उचलला होता हात

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन म्हटलं की त्यांचं आणि रेखा यांच्या अफेयर हे सर्वात आधी समोर येतं. अमिताभ बच्चन व रेखा यांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे. ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला रेखा व अमिताभ बच्चन वेगळे झाले होते. ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे. त्या दोघांचे बरेच किस्से आहेत. त्यांचा असाच एक किस्सा आहे की, अमिताभ बच्चन यांनी एका ईराणी डान्सरमुळे रेखा यांच्यावर हात उचलला होता.

लावारिस चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचे ईराणी डान्सरवर प्रेम जडले होते. त्यांच्या अफेयरची चर्चा मीडियामध्ये खूप रंगली होती. त्यामुळे त्यावेळी रेखा खूप वैतागल्या होत्या. एकदिवस रेखा लावारिस चित्रपटाच्या सेटवर पोहचल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांना याबद्दल खुलासा करायला सांगितला. बिग बी खूप नाराज झाले होते आणि त्यांनी रेखा यांच्यावर हात उचलला आणि त्यांच्या कानशीलात लगावल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com