अमिताभ बच्चन ट्विटरवरही शहेनशहाँ 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

बॉलिवूडचे शहेनशहाँ अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही शहेनशहाँ आहेत, हे ट्विटरवरील त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून दिसून येते. बच्चन यांच्या फॉलोअर्सने 2 कोटी 40 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

बॉलिवूडचे शहेनशहाँ अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही शहेनशहाँ आहेत, हे ट्विटरवरील त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून दिसून येते. बच्चन यांच्या फॉलोअर्सने 2 कोटी 40 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

बच्चन यांच्यानंतर शाहरुख खानचे 2 कोटी 26 लाख फॉलोअर्स आहेत. सलमान खान (2 कोटी 7 लाख), आमीर खान (1 कोटी 93 लाख) यांचा क्रमांक लागतो. बॉलिवूडच्या तारकांमध्ये दीपिका पदुकोनचे 1 कोटी 68 लाख; तर प्रियांका चोप्राचे 1 कोटी 58 लाख फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. चाहत्यांची विक्रमी संख्या पाहून स्वतः अमिताभही आश्‍चर्यचकित झाले असून, त्यांनी एका ट्विटमध्ये 'ट्विटरवर 2 कोटी 40 लाख! बडुम्बा,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Web Title: amitabh bachchan most popular on twitter