तरुणीचा 'हा' व्हिडिओ शेअर करत बिग बी म्हणाले, 'तुझ्यामुळे माझा हॉस्पिटलमधील दिवस...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

big b singer video

बिग बी चाहत्यांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स देण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टी देखील शेअर करत असतात. काही वेळापूर्वीच अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

तरुणीचा 'हा' व्हिडिओ शेअर करत बिग बी म्हणाले, 'तुझ्यामुळे माझा हॉस्पिटलमधील दिवस...'

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन सध्या कोरोनासोबत दोन हात करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोरोनाची लागन झाली होती. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यादरम्यान ते सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. ते चाहत्यांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स देण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टी देखील शेअर करत असतात. काही वेळापूर्वीच अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

हे ही वाचा: 'दिल बेचारा'मध्ये स्वतःच्या अंतिम संस्कारावर बोललेला सुशांतचा 'हा' डायलॉग ऐकून चाहते व्यक्त करतायेत हळहळ

अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी एड शीरीन यांचं प्रसिद्ध 'शेप ऑफ यु' हे गाणं एका खास अंदाजात गाताना दिसतेय. हा व्हिडिओ पोस्ट करत बिग बींनी त्या तरुणीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर तिच्या या गाण्याने त्यांचा हॉस्पिटलमधील दिवस चांगला बनवला असल्याची पावती देखील त्यांनी दिली आहे.

अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'माझा म्युझिक पार्टनर आणि प्रेमळ मित्राने मला हा व्हिडिओ पाठवला आहे. मला नाही माहित ही तरुणी कोण आहे. मात्र मी एवढं नक्की सांगू शकतो की तुझ्याकडे एक खास शैली आहे. देवाचा आशिर्वाद नेहमी तुझ्यासोबत असू दे. तुझं काम करत राहा. तु माझा हॉस्पिटलमधील दिवस पहिल्यापेक्षा जास्त चांगला बनवला आहेस. कर्नाटक आणि वेस्टर्न पॉप मिक्स. सुंदर.'

सोशल मिडियावर अमिताभ यांचं हे ट्विट आणि तरुणीचं गाणं गातानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बिग बी यांचे अनेक चाहते हा व्हिडिओ पसंत करत आहेत. तसंच यावर कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया देखील पोहोचवत आहेत. नुकतंच बिग बींनी त्यांच्या घराबाहेरीला चाहत्यांचा गर्दिचा फोटो पोस्ट करुन भावूक झाले होते.   

amitabh bachchan praise a women video during fight with coronavirus  

loading image
go to top