अमिताभ बच्चन यांची विठ्ठलाकडे प्रार्थना; म्हणाले..

कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी विठ्ठलाला साकडं
amitabh bachchan
amitabh bachchansocial media

सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सर्वजण चिंतेत आहेत. या भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्या जात आहेत. बॉलिवूडदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. ही सर्व परिस्थिती सुधारावी आणि देशात पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे. नुकतीच बिग बींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. विठ्ठल रूक्मिणीचा एक सुंदर फोटो पोस्ट करत त्याला अमिताभ यांनी कॅप्शन दिले आहे.

‘प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विट्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर’, असं लिहिलत बिग बींनी विठ्ठलाची कृपा सगळ्यांवर असावी आणि जे आता देशात अमंगल होत आहे ते सर्व मंगल व्हावे अशी प्रर्थना केली आहे. अनेकांचं श्रध्दास्थान असणाऱ्या विठ्ठलाचे भक्त बिग बीसुद्धा आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, ‘कोरोना कालचक्रामुळे देश घाबरला आहे, पण देवाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहिल.’

हेही वाचा : कोरोनावर मात करताच रणबीर-आलिया निघाले मालदिवला

काही दिवसांपूर्वी बिग बींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी मात केल्यानंतर व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. अमिताभ यांच्या कुटुंबामधील सदस्य़ांना देखील कोरोना झाला होता. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, गोविंदा, आर माधवान, बप्पी लहरी, अक्षय कुमार, आमिर खान, कटरीना कैफ आणि विक्की कौशल या कलाकारांना कोरोना झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com