प्रेग्नंसीमध्ये डान्स करणा-या सरोज खान यांच्यासोबत घडलं होतं असं काही की बिग बी देखील घाबरले होते..

टीम ई सकाळ
शुक्रवार, 3 जुलै 2020

बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील सरोज खान यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. बिग बींनी सांगितलेला हा किस्सा अंगावर शहारे आणणारा आहे. 

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील सरोज खान यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. बिग बींनी सांगितलेला हा किस्सा अंगावर शहारे आणणारा आहे. 

हे ही वाचा: जेव्हा सलमान खानने केला होता सरोज खान यांचा अपमान..

बिग बी अमिताभ यांनी सरोज खान यांच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. बिग बी लिहितात, 'सरोज खानला त्यावेळी डान्सर्सनी घेरलं होतं आणि डान्स करताना एक क्षण असा आला की तिचा गर्भ तिच्यापोटात शिफ्ट झाला आणि तिने न लाजता त्या गर्भाला त्याच्या जागेवर हलवलं आणि पुन्हा डान्स करत राहिली.'

बिग बी पुढे लिहितात की, 'अनेक वर्षांनंतर त्या आणखी पारंगत झाल्या आणि डान्स दिग्दर्शक बनल्या. आणि भाषा बदलण्यासोबतंच ती कोरिओग्राफी देखील बनली. त्या ज्या कोणा कलाकारासोबत काम करायच्या त्यांच्या डान्स मुव्ह्ज लोकांना आवडायच्या. इतकंच नाही तर जेव्हा कोणताही कलाकार त्यांच्या देखरेखीत चांगला शॉट द्यायचा तेव्हा त्या त्याला साईडला बोलवून एक सिक्का शगुन म्हणून द्यायच्या आणि पाठ थोपटायच्या.'

अमिताभ यांनी सांगितलं की अनेक वर्षांनंतर एका गाण्याासाठी त्यांना देखील असाच सिक्का मिळाला जो त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. अमिताभ यांनी 'डॉन' सिनेमाच्या दरम्यानची आठवण सांगितली. त्यांनी लिहिलं, 'डॉन' सिनेमाच्या दरम्यान त्या लग्नानंतर दुबई इथे राहत होत्या. त्यांनी मला सांगितलं की 'मी हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर ज्या कोणत्या थिएटरमध्ये हा सिनेमा लागला होता तिथे मी जायची. जेव्हा तुझं गाणं 'खाईके पान' लागायचं तेव्हा ते पाहून मी  बाहेर यायची. मी रोज असं करत होते.' असं सरोज यांनी बिग बींना सांगितलं होतं. 

सरोज खान यांना या सिनेमातील अमिताभ यांच्या डान्स मुव्ह्ज एवढ्या आवडायच्या की केवळ त्या पाहायला त्या दररोज थिएटरमध्ये जायच्या. अमिताभ यांनी म्हटलंय की 'त्यांचे हे बोलणं देखील माझ्यासाठी खूप मोठं होतं.'  

amitabh bachchan remembers working with pregnant saroj khan when her foetus shifted in stomach  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan remembers working with pregnant saroj khan when her foetus shifted in stomach