अमिताभचा 'खइके पान बनारस' बाबत मोठा खुलासा;म्हणाले,'मी त्याची नक्कल केलेली' Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan Still from 'Don'

अमिताभचा 'खइके पान बनारस' बाबत मोठा खुलासा;म्हणाले,'मी त्याची नक्कल केलेली'

भारतीय सिनेमाचे मेगास्टार आणि बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन(Amitabh Bahchchan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतात. त्यांना नेहमीच ट्वीटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप इंट्रेस्टिंग पोस्ट शेअर करताना नेहमीच आपण पहात असाल. ते आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्याविषयी नेहमीच काही ना काही शेअर करतात. आपल्या सिनेमांविषयी अपडेट देणं त्यांना आवडतं. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. सोशल मीडियाविषयीचं त्यांचं ज्ञान आणि हुशारीनं त्याचा ते करत असलेला उपयोग नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.

हेही वाचा: 'दृश्यम 2'चं शूटिंग सुरू; गोव्यातून सेटवरचा महत्त्वाचा फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन यांनी आता एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूप चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर नजर टाकली तर आपल्याला कळेल त्यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'डॉन' सिनेमातील 'खइके पान बनारसवाला' या लोकप्रिय गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करताना त्यांनी या गाण्याविषयी मोठा खुलासा देखील केला आहे. त्यांनी एक इंट्रेस्टिंग किस्सा सांगितला आहे,जो त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनशी(Abhishek Bachchan) संबंधित आहे. बिग बी यांनी 'खइके पान बनारसवाला' गाण्याची एक छोटीशी क्लीप शेअर केली आहे. पण या क्लिपमध्ये एक मजेदार ट्वीस्ट आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'खइके पान बनारसवाला' गाण्याऐवजी मात्र अभिषेकच्या नुकताच रीलीज झालेल्या 'दसवी' सिनेमातील 'मचा रे' गाण्याचे बोल ऐकायला मिळत आहेत.

व्हिडीओला शेअर करीत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमधून एक खुलासा केला आहे. 'खइके पान बनारसवाला' गाण्यातील काही स्टेप्ससाठी मी अभिषेकच्या डान्स स्टेप्सची नक्कल केल्याचं अमिताभनी म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,''काही डान्स स्टेप्स मी अभिषेकच्या कॉपी केल्या होत्या,जेव्हा तो छोटा होता,तो असाच डान्स करायचा. तो नेहमी साइडला डुलत डान्स स्टेप्स करायचा''. अमिताभ यांच्या या पोस्टवर अभिषेकनं पटकनं प्रत्युत्तर दिलं आहे,''हा..हा...आता पण तेच करतो''.

हेही वाचा: शाहिदच्या 'जर्सी'चे राम गोपाल वर्मानं काढले वाभाडे, म्हणाला....

अमिताभ बच्चन लवकरच आपल्याला 'Runway 34' सिनेमातून दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत अजय देवगण(AJay Devgan),रकुल प्रीत सिंग आणि बोमन ईराणी दिसणार आहेत. अजय देवगणनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे,आणि याचं कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन 'अलविदा' सिनेमात रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) सोबतही पहिल्यांदाच काम करीत आहेत. तसंच,दीपिका पदूकोणसोबत 'द इंटर्न' सिनेमातही ते दिसणार आहेत.

Web Title: Amitabh Bachchan Reveals His Dance Moves In Khaike Paan Banaraswala Were Inspired From One

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top