असा शूट झाला 'नसीब'चा क्लायमॅक्स; बिग बींच्या पोस्टवर नातीची कमेंट

बिग बींनी सांगितला फिरत्या रेस्टॉरंटचा किस्सा
amitabh bachchan
amitabh bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी ८०च्या दशकातील त्यांच्या 'नसीब' Naseeb या चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या चित्रपटातील क्लायमॅक्सचा सीन कसा शूट करण्यात आला, याचा खुलासा त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये केला. मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. बिग बींच्या या पोस्टवर त्यांची नात नव्या नंदानेही Navya Nanda कमेंट केली आहे. (Amitabh Bachchan reveals how Naseeb climax was shot granddaughter Navya Nanda responds)

'फिरत्या रेस्टॉरंटमधील हा क्लायमॅक्सचा सीन चांदिवलीतल्या स्टुडिओमध्ये शूट केला गेला. या स्टुडिओमध्ये हा सेट बांधण्यात आला होता आणि हा फिरता सेट होता. त्यामुळे यातील अॅक्शन सीन्स, ड्रामा, रेस्टॉरंटला लागलेली आग या सर्व गोष्टी फिरत्या सेटवरच शूट करण्यात आल्या होत्या. फक्त महान मनमोहन देसाईच हे यशस्वीरित्या करू शकतात. ८०च्या दशकातील हा चित्रपट आहे, ज्यावेळी वीएफएक्स किंवा सीजी हा प्रकारच नव्हता', असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय. बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते हातात पिस्तुल घेऊन उभे असल्याचं पहायला मिळत आहे. या पोस्टवर नव्याने 'Yaaaassss' अशी कमेंट केली आहे.

amitabh bachchan
'मुलगी झाली हो'मधील 'ही'अभिनेत्री घेणार मालिकेचा निरोप
amitabh bachchan
तिरंगा चित्रपटासाठी नाना पाटेकरांची होती एकच अट, ती म्हणजे...

१९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं होतं. बिग बींच्या नातीने त्यांची ही पोस्ट तिच्या अकाऊंटवर शेअर केली. बिग बी सध्या 'गुडबाय' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत नीना गुप्ता भूमिका साकारणार आहेत. याशिवाय ते 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र' आणि 'झुंड'मध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com