लॉकडाऊन में '' सब काम किया मैंने, झाडू पोछा भी''

Amitabh Bachchan says he did jhaadu pocha during lockdown
Amitabh Bachchan says he did jhaadu pocha during lockdown

मुंबई - कोरोनाचे प्रमाण जसजसे वाढू लागले तसे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीतीही वाढली. अनेकांनी त्याचा धसका घेतला. यावर नेमके काय उपचार करायचे याविषयी प्रशासकीय पातळीवरुन चर्चा सुरु झाली. राज्याची अवस्था बिकट होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन गेला. यानंतर प्रत्येकाचे वर्क फ्रॉम होम सुरु झाले.

 दिवसभर घरात करायचे काय यावर काहींनी पत्नीला घरकामात मदत करण्यास सुरुवात केली. यात अनेक दिग्गजांचा समावेश होता. साक्षात बॉलीवूडचे महानायक यांनीही आपण लॉकडाऊनच्या काळात केलेल्या घरकामाची कबूली दिली आहे.कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांच्या सुत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यादिवशीच्या एका शो मध्ये अमिताभ यांनी आपल्याला लॉकडाऊनमध्ये काय करावे लागले हे सांगितले आणि प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले.

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरातील व्यक्तिंना मदत करत होता. तसे मी ही माझ्या कुटूंबियांना घरकामात मदत केली. याबाबत अधिक माहिती देताना अमिताभ म्हणाले,  आम्ही त्यावेळी 3 जण घरात होतो. मी, अभिषेक, ऐश्वर्या आणि माझी नात आराध्या. आमची नुकतीच कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली होती.

गुरुवारी पार पडलेल्या कौन बनेगाच्या त्य़ा भागात अमिताभ यांनी सहभागी स्पर्धक रुना साहा यांना तुम्ही लॉकडाऊन मध्ये काय केले हे विचारले. त्यांनी उत्तर दिले. यावर एक्स्पर्ट गेस्ट असणा-या रिचा अनिरुध्द यांनी अमिताभ यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी,  हो तर, मी देखील लॉकडाऊनच्या काळात सर्व काम केल्याचे सांगितले. ' झाडू पोचा लगाया. खाना पकाना हमको नही आता आज तक कर रहै है वो ' अशा शब्दांत बिग बी यांनी उत्तर दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com