Amitabh Bachchan: 'शहंशाह इज बॅक'! अपघातानंतर अभिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan: 'शहंशाह इज बॅक'! अपघातानंतर अभिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी अपडेट

बॉलीवूडचे शहंशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरली आहे. काही दिवसांपुर्वीच अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयी माहिती दिली होती.

त्याची हेल्थ अपडेट शेअर केली होती. ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. सर्वच जण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र याच ब्लॉगमध्ये त्यांनी सांगतिले होते की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.

त्यांनतर बिग बी यांनी पुन्हा ब्लॉग शेअर केला आणि लिहिलं होत की,''मला झालेल्या अपघाताविषयी ज्या ज्या लोकांनी चिंता व्यक्त केली,माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे मी आभार मानेन.

ज्या पद्धतीनं तुम्ही सर्व माझ्यासाठी हळवे होता हे पाहून मी खरंच खूप भावूक झालो आहे.डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे त्याचे मी खूप काटेकोरपणे पालन करत आहे''. यानंतर त्याच्या चाहत्यांना जरा बरं वाटलं होतं.'

पण आता बिग बींच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतिच सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा त्याच्या आरोग्याविषयी चाहत्यांना अपडेट दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्याचा फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या प्रकृतीसाठी सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.. मी दुरुस्त होतोय.. लवकरच रॅम्पवर परत येईल अशी आशा आहे. अशी पोस्ट शेअर करत त्यांनी लवकरच कामावर परतणार अशी आशा व्यक्त केली आहे.

80 वर्षिय अभिताभ हे त्याच्या आरोग्याची विषेश काळजी घेतात. यावयातही त्यांनी स्वत:ला फिट ठेवले आहे. ते त्यांच्या फिटनेसवरही फोकस करतात. ते ब्रम्हास्त्र नंतर आता 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचत अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटात त्याच्यासोबत साउथ स्टार प्रभास आणि दीपिका पदूकोण असणार आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. या सिनेमात तुम्हाला जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

या सिनेमाचं बजेट ५०० करोडच्या आसपास असुन नुकतच सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाले आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.

टॅग्स :Amitabh Bachchanviralpost