अचानक हमें एक तस्वीर मिल गयी है, बिग बी नेमकं कुणाबद्दल बोलत आहे?

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

अमिताभ म्हणतात, देवी जी अच्छी लग रही है. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणा-या बिग बी हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.

मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ यांनी केलेलं वक्तव्य असो किंवा त्यांची प्रतिक्रिया याची बॉलीवूडमध्ये दखल घेतली जाते. साक्षात बिग बी यांनी केलेलं कुणाचं कौतूक असेल तर त्याच्यावर नेटक-यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडतो. अशाच प्रकारचे कौतूक एका अभिनेत्रीच्या वाट्याला आले आहे.  अमिताभ यांनी त्या अभिनेत्रीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री कॅटरीना कैफ हिच्यासोबत एक फोटो शेयर केला आहे. त्यात कॅटरीना एका नववधूच्या वेषात आहे. त्यावर अमिताभ यांनी कमेंट केली आहे. त्यात ते म्हणतात, 'अचानक हमें एक तस्वीर मिल गयी है, ढूँढा नहीं हमने ,पन्ना पलटते मिल गयी है; सोचा, देवी जी गहनों में अच्छी लग रही हैं , नीचे बैठे मान्यवर, हमी हैं , हमी हैं ' या फोटोला दोघांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कमेंटस आणि लाईक्स मिळाल्या आहेत. अमिताभ म्हणतात, देवी जी अच्छी लग रही है. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणा-या बिग बी हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. यानिमित्ताने ते आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

अमिताभ यांनी नुकताच कतरिना हिच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोविषयी सांगताना ते म्हणाले, हा फोटो मला अचानक माझ्या अकाऊंटवर भेटला. यावर कतरिनाही बिग बी यांचे कौतूक आणि आभार मानले आहे. या फोटोत कतरिनाने नववधुचा वेष परिधान केला आहे. तर अमिताभ यांचा शेरवानीतील लुक एकदम हटके आहे. गेल्या वर्षी कतरिनाने जया बच्चन, अमिताभ यांच्याबरोबर एक ज्वेलरीची जाहिरात केली होती. तो फोटो त्या जाहिरातीतला असावा असे अनेकांनी म्हटले आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांच्या सुत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा कार्यक्रम ठरला आहे. याच महिन्यातील 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ यांनी वयाची 78 वर्षे पूर्ण केली. या वयातही ते 14 ते 15 तास काम करत आहेत.अमिताभ विशेषत; तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. 

 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan shares bridal look photo of bollywood actress