ऐकावं ते नवलंच...बिग बींच्या रुममध्ये कोण आलं पाहा 

amitabh
amitabh

मुंबई : लॉकडाऊनमुळे साऱ्यांनाच घरात बसण्याची वेळ आली. आणि करमणुकीचं साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक वाढला. चित्रीकरण पूर्णपणे ठप्प असल्याने कलाकार मंडळींची जणू काही जत्राच सोशल मीडियावर भरली आहे. आपल्या नेहमीच्या दिनक्रमातील छोट्या-मोठ्या गोष्टी कलाकार इन्स्टाग्राम, फेसबुकद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहेत. या लॉकडाऊनमुळे काही कलाकारांचा कधी न पाहिलेला अवतार नेटकऱ्यांना पाहायला मिळाला. सारेच जण आपापल्या पद्धतीने लोकांचं मनोरंजन करत असताना बिग बी अमिताभ बच्चन देखील काही मागे हटले नाहीत. अमिताभ सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. आताही लॉकडाऊनच्या काळात ते विविध पोस्ट करत असतात. आताही त्यांनी एक पोस्ट केली आहे. ती म्हणजे चक्क बिग बींच्या रुममध्ये वटवाघुळाने प्रवेश केला आहे. 
`ही तर ब्रेकिंग न्यूज असे म्हणत माझ्या रुममध्ये वटवाघुळाने प्रवेश केला` असे अमिताभ यांनी म्हटले आहे. 

बिग बी कधी एखाद्या विषयावर आपलं सविस्तर मत मांडतात तर कधी मजेशीर पोस्टही शेअर करत असतात. मात्र त्यांची ही पोस्ट काही आऊट ऑफ द बॉक्स होती. जलसावर चक्क वटवाघुळ धडकलं आणि अमिताभ यांना देखील त्याचं आश्चर्य वाटलं. `ब्रेकिंग न्यूज...एक वटवाघुळ चक्क माझ्या रुममध्ये आलं आहे. जलसाच्या तिसऱ्या मजल्यावर ते आहे. जेथे बसून मी आराम करतो. या भागात मी कधीच वटवाघुळ पाहिलं नाही. माझ्या रुममध्ये, माझ्या घरात ते फिरत आहे. आमचंच घर वटवाघुळाला मिळालं. कोरोना तर काही केल्या पाठ सोडेना. पण हा उडत उडत इकडे आलाय.` अशी पोस्ट अमिताभ यांनी शेअर केली आहे. 

बिग बींनी ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टचीच चर्चा रंगू लागली. ट्विटर, इन्स्टाग्रामद्वारे अमिताभ नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. कधी कविता तर कधी कोणाच्या कामाचं भरभरुन कौतुक करतात. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं अमिताभ यांना आवडतं. पण त्यांची ही आजची पोस्ट खरंच टॉक ऑफ द टाऊन ठरली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com