'उन लई वाढलय म्हणुन तो त्याचा..', बिग बींनी शेअर केला 'त्या' व्यक्तीचा व्हिडिओ... |Amitabh Bachchan Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan Video: 'उन लई वाढलय म्हणुन तो त्याचा..', बिग बींनी शेअर केला 'त्या' व्यक्तीचा व्हिडिओ...

Amitabh Bachchan shared video: मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपासून अमिताभ हे जरा जास्तच चर्चेत आहे.

त्याच कारण म्हणजे त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर हेल्मेटशिवाय दुचाकीने प्रवास केला. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं इतकच नाही तर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर फाईनही लावला.

त्यानंतर त्यांनी ते शुटिंग करत असल्याच सांगितलं आणि या प्रकरणी स्पष्टीकरणही दिलं. मात्र आता नुकताच त्यांनी एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती खाकी गणवेशात रस्त्यावरून चालताना दिसत आहे. रस्त्यालगतच्या घराच्या बाल्कनीतून कोणीतरी हा व्हिडिओ शूट केला असावा.

या व्हिडिओमध्ये खाकी गणवेशातील हा माणूस रस्त्यावरून वेगाने चालत आहे. त्यांच्या डोक्यावर केस नसून मागे एक लांब पोनी घातलेली दिसतेय. ती व्यक्ती जितक्या वेगाने चालत आहे तितक्याच वेगाने तो त्याची पोनीही गोल गोल गोल फिरवत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अमिताभ यांनी लिहिले आहे की, ' उन्हाळ्याच्या दिवसात हा गृहस्थ स्वत:ला थंड ठेवण्यासाठी पंख्यासोबत फिरतात.' आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी या व्यक्तीला अलादिनचा जिनी म्हणतं आहे. तर कोणी

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. काहींनी त्याला अलादिनचा जिनी म्हटले आहे. तर कोणी त्याला 'आत्मनिर्भर भारताची संकल्पना' असल्याच म्हणतं आहे.