वडिलोपार्जित हवेली वाचवण्यासाठी अमिताभ बच्चन त्रस्त, ‘गुलाबो-सीताबोचे दुसरे गाणे ‘मदारीका बंदर’ रिलीज 

Amitabh Bachchan struggles to save ancestral mansion, releases Gulabo-Sitabo's second song Madarika Bunder
Amitabh Bachchan struggles to save ancestral mansion, releases Gulabo-Sitabo's second song Madarika Bunder

मुंबईः महानायक अमिताभ आणि आयुष्मान खुराना स्टारर ‘गुलाबो-सीताबो’ या चित्रपटातील दुसरे गाणे ‘मदारी का बंदर’चा व्हिडीओ बुधवारी रिलीज करण्यात आला.

या गाण्यात हवेलीचे मालक मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि त्यांचा भाडेकरू बांके (आयुष्मान खुराना) यांच्यात ‘फातिमा महल’ या हवेलीवरुन संघर्ष सुरू आहे. तसेच गाण्यातील बऱ्याच शॉट्समध्ये अमिताभ लखनौच्या रस्त्यांवर फिरतानाही दिसत आहेत.

‘बन गया मदारी का बंदर, डुगडुगी पे नाचे सिकंदर।
खन-खन खनके गिनती के सिक्के, सांसों की टकसाल में
मोहमाया ने उलझाया, किस फरेबी जाल में,
खारे पानी में ढूंढे मीठा समंदर।
अरे बन गया मदारी का बंदर, डुगडुगी पे नाचे सिकंदर।’

अमिताभ  मारतोय ऑफिसमध्ये चकरा
या गाण्यात मिर्झाची भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन खूप अस्वस्थ दिसत आहेत. व्हिडिओ गाण्यामध्ये अमिताभ बच्चन वडिलोपार्जित घर वाचवण्यासाठी ऑफिसमध्ये चक्कर मारताना दिसत आहेत. दुसरीकडे आयुष्मान अमिताभ काय काय करत आहे यासाठी  नजर ठेवून आहे.

12 जूनला होणार प्रदर्शित
चित्रपटाचे हे गाणे अतिशय सुंदरपणे सादर केले आहे. या गाण्याला तोषी रैना आणि अनुज गर्ग यांनी स्वरसाज चढवला आहे. त्याचबरोबर त्याचे संगीत अनुज गर्ग यांनी दिले आहे. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 12 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे. या गाण्यापूर्वी ‘जूतम फेक’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com