अमिताभ बच्चन चक्क फिरले रिक्षातून पण...

amitabh bachchan traveling in rickshaw pics goes viral from gulabo sitabo
amitabh bachchan traveling in rickshaw pics goes viral from gulabo sitabo

लखनौः बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन चक्क रिक्षातून फिरले. पण, त्यांना कोणीही ओळखू शकले नाही. रिक्षातून फेरफटका मारत असतानाचे त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. बच्चन यांनीही त्यांच्या वेगवेगळ्या लूकची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत.

अमिताभ बच्चन सध्या 'गुलाबो सिताबोच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामधील त्यांचा लूक वृद्धाचा असून, या लूकची चर्चा आहे. शिवाय, सोशल मीडियावरूनही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. लखनौच्या रस्त्यावरचा त्यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात ते रिक्षातून प्रवास करताना दिसतात. रिक्षात बसलेली व्यक्ती अमिताभ बच्चन आहे, हे कोणालाही ओळखता येत नाही. चित्रीकरणादरम्यान कधी चारबाग बस स्टँडवर फिरताना तर कधी रिक्षातून प्रवास करताना त्यांचे अनेक शॉट घेण्यात आले आहेत.

अमिताभ बच्चन यांना मेकअपसाठी रोज तीन तास लागतात, असे त्यांनी लिहिले आहे. यापूर्वी 'पा; चित्रपटासाठी बच्चन यांचा वेगळा लूक होता. 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. 'गुलाबो सिताबो' व्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र' आणि 'चेहरे' या चित्रपटातही ते वेगळी भूमिका साकारणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com