esakal | बॉलीवूडच्या डॉनला 'पान-मसाला' पडला महागात
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूडच्या डॉनला 'पान-मसाला' पडला महागात

बॉलीवूडच्या डॉनला 'पान-मसाला' पडला महागात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील (bollywood) मेगास्टार म्हणून अमिताभ (amitabh bachchan) यांचे नाव घेतले जाते. केवळ भारतातच नाहीतर जगभरात त्यांची लोकप्रियता आहे. हॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मात्र कित्येकदा बिग बींना देखील मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनी केलेल्या जाहिरातीवरुन चाहत्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. अनेकांनी त्यांना यावरुन प्रश्नही विचारले आहे. वास्तविक बिग बी यांनी चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तर देणं टाळल्याचे दिसते आहे. सध्या ते ट्रोल होताना दिसत आहेत. त्याचे कारण त्यांनी एका उत्पादनाची केलेली जाहिरात. प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं त्याच्या एका पत्रकार परिषदेमध्य़े बियरच्या बाटलीऐवजी पाण्याची बाटली ठेवली होती.त्यावरुन त्या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती.

बिग बींचा कौन बनेगा करोडपती नावाचा रियॅलिटी शो प्रचंड लोकप्रिय होतो आहे. यावेळी बिग बी यांनी कमला पसंद या कंपनीच्या एका उत्पादनाची जाहिरात केली आहे. त्यावरुन त्यांना चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी त्यांना अशाप्रकारच्या जाहिराती तुम्हाला करण्याची खरच गरज आहे का, असा प्रश्न विचारला आहे. बिग बींनी जी कमला पसंदची जाहिरात केली आहे त्यात त्यांच्या जोडीला रणवीर सिंगही आहे. अमिताभ सारख्या सेलिब्रेटी कलाकारांन अशाप्रकारची जाहिरात करावी हे त्यांच्या चाहत्यांना पटलेलं नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावरुन अमिताभ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय. तुम्ही या उत्पादनाची जाहिरात का करता आहात असा प्रश्न चाहत्यांनी त्यांना विचारला आहे. एका युझर्सनं त्यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, बिग बी तुमच्याकडून अशाप्रकारचं कृत्य अपेक्षित नव्हतं. तुम्ही कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. अशावेळी तुम्ही पान मसाल्याच्या जाहिराती करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यानं विचारला आहे. तुम्ही ही जाहिरात केल्यानं समाजात चूकीचा संदेश जातो आहे असे तुम्हाला वाटत नाही का,

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांना फॅनचा फ्लाइंग KISS; बिग बी म्हणाले, मेरी शादी खतरे में..

हेही वाचा: 'बिग बी तुम्ही झोपा,आम्हालाही झोपू द्या',का म्हणाले युझर्स असं?

आणखी एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्ही हे सगळं पैशांसाठी करत आहात का, ही जाहिरात करुन तुम्ही देशाला काय संदेश देणार आहात, तेव्हा कृपया करुन अशा जाहिराती करणं थांबवा. असं ट्रोलर्सनं त्यांना सुनावले आहे.

loading image
go to top