स्कर्टची लांबी तुमचे चारित्र्य ठरवत नाही-अमिताभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

मुंबई - ‘तुमच्या स्कर्टची लांबी तुमचे चारित्र्य ठरवत नाही‘, असे म्हणत ‘तुम्ही मुलगी आहात म्हणून समाज तुमच्यावर काही मर्यादा घालण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या विचारांवर बंधने आणेल‘, मात्र या साऱ्या परिस्थिीत तुम्हाला जे वाटतं तेच करा, असा संदेश अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातींना दिला आहे. 

अमिताभ यांचे पुत्र अभिषेक-ऐश्‍वर्या यांची कन्या आराध्या आणि अमिताभ यांची कन्या श्‍वेता यांची कन्या नव्या नवेली यांना लिहिलेल्या पत्रात अमिताभ यांनी मोलाचा संदेश दिला आहे. हे पत्र त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे. भारतातील लिंगभेद आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या नातवंडांना मोलाचा मंत्र दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "तुमच्या स्कर्टची लांबी तुमचे चारित्र्य ठरवत नाही. तुम्ही कोणासोबत मैत्री करावी, हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. नव्या, तुझे नाव आणि तुझे आडनाव तुला महिला म्हणून होणाऱ्या अडचणींपासून वाचवू शकत नाहीत. आराध्या, तुला ज्यावेळी मी जे म्हणतोय ते समजेल त्यावेळी कदाचित मी तुझ्या आसपास नसेल. मात्र मी आता जे काही सांगत आहे ते तेव्हा देखील उपयुक्त ठरेल.‘

Web Title: Amitabh Bachchan writes letter to his granddaughters