'मिसेस मुख्यमंत्री' सुमीचे 'बर्थ डे' सेलिब्रेशन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आनंद, उत्साह अन् टाळ्यांच्या गजरात चक्क 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील सुमी अर्थातच अमृता धोंगडे हिचा वाढदिवस 'सकाळ'च्या वतीने साजरा करण्यात आला.

पुणे : आनंद, उत्साह अन् टाळ्यांच्या गजरात चक्क 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील सुमी अर्थातच अमृता धोंगडे हिचा वाढदिवस 'सकाळ'च्या वतीने साजरा करण्यात आला.

पुणे शहरासह उपनगरातील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा 'हॉटेल ऑर्किड' येथे शुक्रवारी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुमी अन समर अर्थातच अभिनेता तेजस बर्वे उपस्थित राहणार होते. कार्यक्रम सुरू होताचं सर्वांना उत्सुकता लागली ती सुमी अन समरला पाहण्याची. काही वेळातच दोघेही व्यासपीठावर विराजमान झाले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलले. मान्यवरांचा सत्कार सोहळा सुरू असतानाच सुमीचा आज वाढदिवस असल्याचे समजले. मग, सूत्रसंचालकांनी घोषणा करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. हे पाहून सुमीही भारावून गेली.

कार्यक्रमाचा समारोप होत असतानाच सूमीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी चक्क व्यासपीठावर केक आणला गेला अन् सुमीसह तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सुमीने केक कापला अन् आपल्या चाहत्यांनाही खाऊ घातला. त्यानंतर सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सुमी अन् समरबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Dhongade Celebrates her Birthday