सौ. फडणवीस व 'बिग बीं'चे छायाचित्र व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचे एका गाण्यातील छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे.

सौ. फडणवीस यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करत असून, आवाजाबरोबरच मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यासाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये त्यांनी रॅम्पवॉक केला होता. सौ. फडणवीस या लवकरत एका अल्बमच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहेत. संबंधित छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे.

गिरगावमधील ऐतिहासिक 'ऑपेरा हाऊस'मध्ये 'फिर से...' या गाण्याचे शुटींग नुकतेच पार पडले आहे. या गाण्याला सौ. फडणवीस यांनीच आवाज दिला आहे. या गाण्यामधून सौ. फडणवीस या ग्लॅमरस अंदाजात रसिकांसमोर येणार असून, हाय हिल्स व लाल रंगाच्या कपड्यांमध्ये त्या झळकणार आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खानने व्हिडीओसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनीच ट्विट करत आपण एका सेलिब्रिटीसोबत शूट करत असल्याचे म्हटले आहे. संबंधित छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: amruta fadanvis and amitabh bachchan's image viral