'100 करोड क्लब'मध्ये अमृता खानविलकरची एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

राझीमुळे 100 करोड क्लब मध्ये पोहोचायचा मान अमृता खानविलकरला मिळाला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राझी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. राझीमुळे 100 करोड क्लब मध्ये पोहोचायचा मान अमृता खानविलकरला मिळाला आहे.

raazi

मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने अमृताच्या या यशाचं कौतुक करताना म्हटलंय की, मराठी सिनेसृष्टीत नाव कमवून आपल्या बॉलीवूड करीयरच्या सुरूवातीच्या काळातल्याच एका फिल्मला मिळालेलं हे घवघवीत यश अमृतासाठी नक्कीच महत्वाचे ठरेल.

‘राझी’च्या यशाने आनंदून गेलेली अमृता खानविलकर यावर प्रतिक्रिया देताना म्हणते, “सध्या माझा आनंद गगनात मावत नाही आहे. करण जोहर सर, मेघना गुलजार मॅम, आलिया, विकी आणि युनिटमधल्या प्रत्येकाचीच मेहनत फळाला आलीय, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी आहे.”

Web Title: amruta khanvilkar enters in 100 crore club for raazi