esakal | ऐन थंडीत,अ‍ॅमी जॅक्सनचं कडक 'हॉट' फोटोशूट
sakal

बोलून बातमी शोधा

ami jackson news

हल्ली अभिनयापेक्षा वादग्रस्त पोस्ट, वेगवेगळे फोटो पोस्ट करुन त्यावरुन लक्ष वेधून घेणा-या कलाकारांची संख्या वाढताना दिसत आहे. यात अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनचं नाव घ्यावं लागेल. ‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ अशा अनेक चित्रपटांत काम करणा-या अ‍ॅमीने सोशल मीडियावर आपला एक हॉट फोटो शेयर केला आहे.

ऐन थंडीत,अ‍ॅमी जॅक्सनचं कडक 'हॉट' फोटोशूट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या समुद्र किनारी काढलेल्या 'फोटो'मुळे भलताच चर्चेत आला होता. त्याने तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे प्रचंड व्हायरल झालेल्या मिलिंदला अनेकांकडून टीकेला सामोरं जावं लागलं होत. त्यावर त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता त्यासारखचं हॉट फोटोशुटचे धाडस मॉडेल व अभिनेत्री अॅमी जॅक्सननं दाखवलं आहे. त्यामुळे ती ही वादात सापडली आहे.

हल्ली अभिनयापेक्षा वादग्रस्त पोस्ट, वेगवेगळे फोटो पोस्ट करुन त्यावरुन लक्ष वेधून घेणा-या कलाकारांची संख्या वाढताना दिसत आहे. यात अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनचं नाव घ्यावं लागेल. ‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ अशा अनेक चित्रपटांत काम करणा-या अ‍ॅमीने सोशल मीडियावर आपला एक हॉट फोटो शेयर केला आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणा-या अॅमीला आता टीकेला सामोरं जावं लागत आहे.

अ‍ॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. तिचा हा टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अ‍ॅमीच्या या फोटोला 5 लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंटही दिल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी गोव्यातील समुद्रकिनारी मिलिंदला बोल्ड फोटोशुट करणे चांगलेच महागात पडले होते.त्याने त्य़ाच्या जन्मदिनाच्या दिवशी बोल्ड फोटोशुट करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यामुळे तो चर्चेत आला होता.

मिलिंदवर वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या त्या फोटोच्या विरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली. 


 

loading image
go to top