'अंदाज अपना अपना’चे सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन

ishwar bidri
ishwar bidri

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं 

ईश्वर बिदरी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जायचे. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ईश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. १९७१ साली ‘कारवा’ या सिनेमातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘हातिम’, ‘हत्यार’, ‘अंगार’, ‘इन्साफ’ ‘अपने लहूसे’, ‘मेरे दो अनमोल रतन’ यांसारख्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली.

‘अंदाज अपना अपना’, ‘बॉर्डर’, ‘अंदाज’ हे त्यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ओळखले जातात. किंबहूना या सिनेमांमुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. सिनेमॅटोग्राफीसोबतच त्यांनी काही दाक्षिणात्य सिनेमांची निर्मिती देखील केली आहे. ईश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

andaz apna apna cinematographer ishwar bidri dies at 87  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com