अंधाधुन चीनमध्ये हिट, शाजाम या हॉलिवूडपटाला टाकले मागे

बुधवार, 10 एप्रिल 2019

मुंबई - श्रीराम राघवन दिर्गदर्शित अंधाधुन भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला. परंतु, ही लोकप्रियता फक्त भारतापुरताच मर्यादीत राहिली नाही. नुकताच चीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेथेही या चित्रपटाने लाकप्रियतेचे शिखर गाठले आहे. शाजाम या हॉलिवूडपटालाही अंधाधुनने मागे टाकले आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. शाजाम या हॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत अंधाधुन सध्या चीनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

भारतात अंधाधुन 2018 मधला सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित मर्डर मिस्ट्रीवर आधारित अंधाधुन प्रेक्षकांना अतिशय आवडला. आयुष्मानसोबत राधिका आपटे आणि तब्बू यांच्या चित्रपटातील भूमिकांचेही भारतात बरेच कौतुक झाले.