अनिल कपूरही एटीएमच्या रांगेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मुंबई - नोटबंदीच्या निर्णयानंतर बॅंक आणि एटीएम समोरच्या रांगा काही नवीन राहीलेल्या नाहीत. मुबईमधील एका हॉटेलच्या लॉबीमध्ये असलेल्या एटीएमपुढे देखील अशीच रांग होती आणि अचानक तेथे अनिल कपूरचीही एन्ट्री झाली. 

झक्कास जॅकेट आणि बेसबॉल कॅपमधल्या अनिल कपूरबरोबर चाहत्यांनाही सेल्फीचा मोह आवरला नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्याबरोबर सेल्फी काढले. तसेच आपला रांगेत उभे राहण्याचा वेळही त्यामुळे मस्त गेल्याचे काही चाहत्यांनी ट्विट केले. आपले सेल्फी देखील त्यांनी पोस्ट केले. त्यातील काही ट्विट खूद्द अनिल कपूरने आपल्या अकांऊटवर देखील शेअर केले आहेत. 

तसेच सरकारच्या या निर्णयामुळेच मला माझ्या चाहत्यांना भेटण्याची अशी संधी मिळाल्याचे अनिल कपूरने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे. 

Web Title: Anil Kapoor Clicks Selfies With Fans In ATM Line