esakal | ''आवडीचं आणि आवडीनं खाणं सोपं, वजन कमी करताना येतं रडू ''
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kapoor posts shirtless pic shares his fitness journey

एका समुद्र किना-यावर अनिल यांचा तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अनिल कपूर आता 63 वर्षांचे आहेत. लॉकडाऊनच्या काळात स्वतला फिट ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. यासाठी आपल्याला आपला मुलगा हर्ष वर्धन याने मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

''आवडीचं आणि आवडीनं खाणं सोपं, वजन कमी करताना येतं रडू ''

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अनिल कपूरचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या नावाची क्रेझ टिकून आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील उर्जा, कामातील उत्साह नव्या कलाकारांना प्रेरणादायी ठरत आहे. अनिल कपूर यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांचा 'शर्टलेस' फोटो शेयर केला आहे. त्यातून त्यांनी तरुणाईला फिटनेसचे महत्व पटवून दिेले आहे.

एका समुद्र किना-यावर अनिल यांचा तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अनिल कपूर आता 63 वर्षांचे आहेत. लॉकडाऊनच्या काळात स्वतला फिट ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. यासाठी आपल्याला आपला मुलगा हर्ष वर्धन याने मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंटास्टाग्रामवर शेयर करण्यात आलेल्या त्यांच्या या फोटोला मोठ्या प्रमाणात कमेंटस मिळत आहे. फोटोतून या वयातही अनिल किती फिट आहेत हे दिसून् येते. विशेष म्हणजे त्यांनी या दरम्यानच्या काळात फिटनेस ठेवण्यासाठी जे काही केलं त्याची पोस्टही चाहत्यांसाठी शेयर केली आहे.

''सुरज पे मंगल भारी''चा ट्रेलर पाहिलायं; मनोज वाजपेयीची भूमिका ठरणार लक्षवेधी

लॉकडाऊनच्या काळात स्वतला फीट ठेवणे आव्हानात्मक होते. मात्र त्यासाठी मला माझ्या मुलाचे खुप सहकार्य मिळाले. हर्षवर्धनने केलेल्या सुचना उपयोगी ठरल्या. त्यामुळे हा अवघड प्रवास सोपा झाला. मला वाटतं प्रत्येकाचा एखादा वीक पॉईंट असतो. फुडी असणे हा माझा वीक पॉईंट आहे. माझ्यासारख्या पंजाबी मुलाला खवय्येगिरी अधिक पसंद आहे. आवडीचे खाणे आणि आवडीने खाणे याचा शौक असल्याने घ्यावी काळजी घ्यावी लागते. मी जेव्हा स्वताच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचे ठरवले त्यासाठी एक वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मी डायेट फॉलो केलं. मुलाने ज्या सुचना केल्या त्याचेही पालन केले. असे अनिल यांनी सांगितले.

माझा दुसरा ट्रेनर मार्क याचे माझ्यावर सारखे लक्ष होते. थोडे कमी जास्त झाले तर तो तातडीने सुचना देत होता. मला हे सगळे करताना थोडा त्रास झाला. मात्र मी ते सगळं चिकाटीने केलं. आणि वजन कमी करण्याची लढाई जिंकली. यासगळ्यात ब-याचदा मला अशक्तपणा जाणवायचा. यावेळी घरातले प्रत्येकजण त्याविषयी चौकशी करायचे. माझा आहार पूर्णपणे बदलला. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. फिटनेस राखणे यात केवळ तुमचं श्रेय असतं असे नाही त्यात सगळ्या घराचे योगदान असते हे लक्षात ठेवता येईल. असेही अनिल यांनी यावेळी सांगितले.