अनिल कपूरच्या नातवाची झलक सर्वात अलग....... तुम्ही पाहिलीत का?

आईच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर केला 'वायु'चा फोटो शेअर
Anil kapoor
Anil kapooresakal

Bollywoodचा एव्हरग्रीन अॅक्टर म्हणुन ओळखले जाणारे अनिल कपूर हे अजोबा झालेत. मात्र त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही.नातू झाल्याचा आनंद त्यांना किती झालाय... हे काही वेगळ सांगायची गरजच नाही.सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी मुलगा वायु कपूर आहुजा याचे नाव जाहिर केले होते.मात्र त्याच्या शेअर फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता.

Anil kapoor
Sonam Kapoor: कुर्रर्र...! सोनमच्या बाळाचं नाव ठरलं, आजोबा नातवाला...

अनिल कपूरने आईला वाढदिवसानिमित्त विश करत छानसा फॅमिली फोटो शेअर केलाय. यात अनिल कपूरची आई ,बायको, मुलगी आणि नातू अशा चार पिढ्या एकाच फोटोत दिसताय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कारण त्यात वायुचा चेहरा अगदी स्पष्टच दिसतोय.त्यामुळे वायुचा चेहरा रिव्हिल झालाय.

अनिल कपूरने आई निर्मल कपूरला शुभेच्छा देत फोटो शेअर करून मस्त कॅप्शन दिलय.यात ते म्हणतात,"अद्भुत मुलगी, पत्नी, आई, आजी आणि आता पणजी, आज तिचा ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत! तुझ्यासारखं कोणी असूच शकत नाही! वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅाम !" वायुच्या नामकरणावेळीचा फोटो अनिल कपूरने पोस्ट केलाय. २० ऑगस्ट रोजी सोनम कपूर आणि आनंद आहुजा याच्या घरी या पाहुण्याच आगमन झाल होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com