अंकिता बॉलीवूडपटात? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

"पवित्रा रिश्‍ता'फेम अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीत तशी जुनी; पण नशीबाने तिला काही साथ दिली नाही.

"पवित्रा रिश्‍ता'फेम अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीत तशी जुनी; पण नशीबाने तिला काही साथ दिली नाही. पवित्र रिश्‍ता सोडून तिची आणखी कोणतीही मालिका अथवा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळालेला नाही.

तरीही तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सुशांत सिंग राजपूतबरोबर असलेल्या तिच्या अफेअरमुळे बराच काळ ती चर्चेत राहिली. 2009 मध्ये "पवित्र रिश्‍ता' ही मालिका सुरू झाली आणि त्यानंतर ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली. 2014 मध्ये या मालिकेचा शेवट झाला. सुशांतने "पवित्र रिश्‍ता' ही मालिका सोडल्यावर आता बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. पण यानंतर अंकिता कोणत्याच मालिकेत वा चित्रपटात दिसली नाही.

गेली अनेक वर्षे अंकिता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा येत होत्या. शाहरूख खान - दीपिका पदुकोणच्या "हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा होती. पण काही कारणाने ती त्या चित्रपटात दिसली नाही. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या "पद्मावती' चित्रपटातही ती दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण तेव्हाही तिची डाळ शिजली नाही.

आता अंकिता संजय दत्तच्या "मलंग' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगताहेत. या चित्रपटात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या वेळी तरी अंकिताचे नशीब उघडणार की नाही, हे तिने चित्रपट साईन केल्यावरच कळेल. ऑल द बेस्ट अंकिता! 
 

Web Title: ankita lokhande in bollywood movie?