काहीही काय? अफवाच त्या! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

'पवित्र रिश्‍ता' या मालिकेमुळे नावारूपास आलेले सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे काही काळ एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर काही कारणामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि ते वेगळे झाले... पुढे सुशांत बॉलीवूडमध्ये गेला आणि सुपरस्टार झाला. पण अंकिता मात्र अजून स्ट्रगल करतेय आणि ती कुठल्याही मुलासोबत फिरताना दिसली तरी त्याचीही चर्चा होतेय. यामुळे अंकिता अगदी वैतागून गेलीय.

अलीकडेच तिचे उद्योगपती विकास जैन याच्याशी प्रेमकरण सुरू आहे, अशी चर्चा होती. यावर एका माध्यम प्रतिनिधीने तिचं मत विचारलं, तेव्हा ती चिडून म्हणाली, काय बोलू यावर...मी कुठेही जाईन, काहीही करीन. प्रत्येक गोष्टीची बातमी झालीच पाहिजे का? आणि माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंध कसले जोडत बसता. या सगळ्या अफवा आहेत. मी ज्याला भेटते त्याच्याशी माझं प्रेमकरण सुरू असतं, असं म्हणण्यासारखं आहे हे... कुशल टंडननंतर आता माझं का उगाच विकास जैन याच्याशी नातं जोडलं जातंय? तसं काही नाहीच, तर मी का स्पष्टीकरण देऊ? खरं तर अभिनेता अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा हिने अंकिताची ओळख विकास जैनशी करून दिली होती. हे सगळं तेव्हापासून सुरू झालेलं. पण आता अंकिताच म्हणतेय, की त्या सगळ्या अफवा आहेत; तर विश्‍वास ठेवावाच लागेल ना... 

संकलन : भक्ती परब 
 
Web Title: Ankita Lokhande BREAKS SILENCE on rumours of her dating Vikas Jain!