क्लासमेट्स पुन्हा एकत्र; अंकुश चौधरी-आदित्य सरपोतदार नव्या सिनेमात

टीम ई सकाळ
बुधवार, 14 जून 2017

मुंबई : दोन वर्षांपूर्वी आलेल्या क्लासमेट्सला रसिकांची चांगली दाद मिळाली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित सिनेमात अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. आता हाच दिग्दर्शक आणि अंकुश पुन्हा एकत्र येणार आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप नक्की नसून सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा येणार आहे. 

याबाबतची घोषणा या सिनेमाचे निर्माते वायकाॅम 18 यांनी केली. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अादित्य म्हणाला, 'या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आम्ही दोन चार नावांवर विचार करतोय. ही एक सरळ, सोपी फिल्म असून कोकणात याचे शूट झाले आहे.' 

Web Title: ankush chaudhari and aditya sarpotdar togather esakal news