Theater
Theatersakal

दक्षिण मुंबईतील आणखीन एक चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड

अलंकार झाले बंद

मुंबई : गेल्या दशकभरात दक्षिण मुंबईतील नाझ, अप्सरा, गंगा-जमुना, ड्रिमलँड, नाॅव्हेल्टी आदी सिंगल स्क्रीनवर अखेरचा पडदा पडलेला होता. आता या चित्रपटगृहांपाठोपाठ गिरगाव-खेतवाडीमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले अलंकार चित्रपटगृहदेखील काळाच्या पडद्याआड गेले आहे. एकापाठोपाठ एक सिंगल स्क्रीन बंद होत असल्यामुळे चित्रपट रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.  

दक्षिण मुंबईतील हिंदी चित्रपटांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे असे हे अलंकार चित्रपटगृह होते. पूर्वी या जागेवर कमल नावाचे चित्रपटगृह होते. सन १९६० मध्ये तेथे अलंकार हे वातानुकूलित आणि एक हजार आसनक्षमता असलेले चित्रपटगृह मोठ्या डौलाने उभे राहिले. मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित आणि बिमल राॅय प्राॅडक्शन निर्मित उसने कहा था हा हिंदी चित्रपट पहिल्यांदा तेथे प्रदर्शित झाला. सुनील दत्त आणि नंदा यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. त्यानंतर असंख्य हिंदी चित्रपट येथे प्रदर्शित झाले. जब जब फूल खिले, आया सावन झुमके, आन मिलो सजना, चरस, जुगनू, फूल और पत्थर अशा कित्येक चित्रपटांनी तुफान यश मिळविले.

Theater
"सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा"

अमिताभ बच्चन यांच्या बाॅम्बे टू गोवा, खून पसिना, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, कुली, आज का अर्जुन या चित्रपटांनी याच चित्रपटगृहात घवघवीत यश मिळविले. जिस देश मे गंगा बहती है या हिंदी चित्रपटाचा तेथे प्रीमियर झाला. जीवनमृत्यू आणि जय संतोषी माँ या चित्रपटांनी मॅटिनीला चांगला व्यवसाय केला. अनेक हिंदी चित्रपटांच्या यशाचे भागीदार असलेले हे चित्रपटगृह आता कायमचे बंद करण्यात आले आहे. चित्रपटगृहाच्या देखभालीचा खर्च आणि एकूणच अन्य खर्च परवडत नसल्यामुळे ते बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

या चित्रपटगृहाचे मालक विजय शंभुलाल जोबनपुत्र म्हणाले, की चित्रपट पाहायला पूर्वीसारखे आता फारसे प्रेक्षक येत नाहीत. त्यातच देखभाल आणि अन्य खर्च आम्हाला परवडत नाही.

Theater
अखेर न गरजणारे; बरसलेच नाहीत

त्यामुळे गेली दोन वर्षे आम्ही चित्रपटगृह बंद ठेवलेले आहे आणि आता ते उघडणे शक्यच नाही. त्या जागेवर आता काय करायचे ते ठरविलेले नाही. सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झीबीटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले, की सिंगल स्क्रीनच्या काही मागण्या आहेत. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अद्यापही पाळले गेले नसल्यामुळे सिंगल स्क्रीन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com