Bollywood vs South: अजय - सुदीपच्या वादात भजन सम्राट अनुप जलोटांची उडी

भारतातील मनोरंजन विश्वामध्ये सध्या अजय देवगण (Ajay Devgn) आणि सुदीपचा (Sudeep) वाद सुरु आहे.
Ajay devgn and Sudeep
Ajay devgn and Sudeep esakal

Entertainment News: भारतातील मनोरंजन विश्वामध्ये सध्या अजय देवगण (Ajay Devgn) आणि सुदीपचा (Sudeep) वाद सुरु आहे. हिंदी भाषेवरुन सुरु झालेला वाद संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. त्यामध्ये आता विविध सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया देऊन त्या वादाला वेगळाच रंग दिला आहे. (Anup Jalota) राजकीय मंडळी देखील त्या वादामध्ये सहभागी झाल्या आहेत. चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सुदीपची बाजु घेत त्यांच्या मतदारांना दिलासा दिला आहे. दुसरीकडे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी अजयच्या पाठीशी उभे (Social media news) राहताना दिसत आहे. अजयचा उद्या रन वे नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असून सध्या तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये हिंदी भाषेवरुन वादाला सुरुवात झाली आहे. अजय म्हणतो तुम्हाला हिंदी भाषेविषयी आदर नसल्यास तुमचे चित्रपट हिंदीमध्ये डब कशासाठी करता, सुदीप म्हणाला होता, हिंदी काही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे त्या भाषेमध्ये काम करणे आणि त्यात चित्रपट निर्मिती करणे याला आपलं प्राधान्य नाही. यासगळ्या वादात प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांनी उडी घेतल्याचे दिसून आले आहे. अजयनं आपल्या ट्विटमधून हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आहे आणि नेहमी राहणार अशा प्रकारचे ट्विट केले होते. त्यावरुन सुदीप आणि अजय यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.e

Anup Jalota Comment on Ajay Devgn Sudeep
Anup Jalota Comment on Ajay Devgn Sudeep esakal

अनुप जलोटा यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दक्षिण भारतातील चित्रपट हे हिंदीमध्ये डब केले जातात. याचे कारण म्हणजे हे चित्रपट भारतभरामध्ये पोहचावे हा त्यामागील उद्देश आहे. एका मुलाखतीमध्ये जलोटा यांनी सांगितलं की, गांधीजी हे नेहमीच हिंदीमध्ये बोलत असत. भारताचे बहुतांशी लोक हे हिंदी जाणतात. त्यांना समजते. त्यांना बोलताही येते. मात्र सध्या आता त्यावर चर्चा करुन आपण उगाचच वेळ वाया घालवत असल्याचे जलोटा यांनी म्हटले आहे.

Ajay Devgn Sudeep Anup Jalota Comment
Ajay Devgn Sudeep Anup Jalota Comment esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com