
छत्तीसगढ मधल्या अनुपा दास यांची गोष्टच पूर्ण वेगळी आहे. अथक संघर्ष करुन त्या शिक्षिका झाल्या. ज्ञानदानाचे काम केले.
मुंबई - जीवनात प्रत्येकानं काही ना काही ध्येय ठरवलेलं असतं. कोणी पायलट होतं. कुणी डॉक्टर तर कुणी शास्त्रज्ञ, या प्रत्येकाची स्वप्नं खरी होतात असे नाही. ते पूर्ण करण्यासाठी अपयश आले तरी धैर्याने, निश्चयाने त्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करत राहणे हा त्या व्यक्तीचा स्थायी भाव होऊन जातो. तसं झाल्यावर अशक्यप्राय वाटणारं कधी पूर्ण झालं यावर त्या व्यक्तीचा विश्वास बसत नाही.
छत्तीसगढ मधल्या अनुपा दास यांची गोष्टच पूर्ण वेगळी आहे. अथक संघर्ष करुन त्या शिक्षिका झाल्या. ज्ञानदानाचे काम केले. मात्र परिस्थितीनं त्यांच्यापुढे अशी काही संकटं उभी केली की त्यामुळे त्यांच्यापुढील प्रश्न आणखी गंभीर झाला. आईला कर्करोग झाला होता. अशावेळी काय करावं कळेना. मात्र काहीही झालं तरी हार मानायची नाही अशी जिद्द बाळगलेल्या अनुपा यांचा प्रवास कुणालाही भारावून टाकणारा आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असणा-या सेलिब्रेटी आहेत.
And we have the third Crorepati of Season 12! Tune into #KBC12 NOW to watch ANUPA's grand moment of victory and RT to join the celebration. @SrBachchan @SPNStudioNEXT pic.twitter.com/IDjjdzUwaG
— sonytv (@SonyTV) November 25, 2020
अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती 12' च्या तिस-या करोडपती झाल्या आहेत. त्यांनी एका वृ्त्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपला जीवनप्रवास कथन केला आहे. त्या म्हणाल्या, मी माझा विजय माझ्या कुटुंबाला, विशेषत: माझ्या पालकांना समर्पित करते. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे केबीसीचे विजेतेपद मिळवू शकले.
अनुपा यांना कधीही स्वप्नातही असे वाटले नव्हते की आपण करोडपती होणार आहोत ते. त्याविषयी सांगताना त्या म्हणतात, केबीसीने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. माझ्याबद्दल आणि माझ्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे. हे सगळं मला शब्दांत व्यक्त करता येणं कठीण आहे.
रेखा म्हणे,'मी काही दाखवायची वस्तू आहे का?
या शोमध्ये भाग घेण्याची अनूपा यांची पहिली वेळ होती. मात्र पहिल्या सीझनपासून त्या शो मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यासाठी त्यांनी तब्बल बारा वर्षे वाट पाहिली. तेव्हा कुठे माझी प्रार्थना देवाने ऐकली. त्यानंतर ती 'वन्स इन लाइफटाइम' संधी मिळाली. मला मिळालेला पैसा हा मला माझ्या कर्करोग झालेल्या आईच्या उपचारांसाठी वापरायचा आहे. ती कॅन्सरच्या तिस-या स्टेजला आहे.
'कोणं म्हटलं,वेबसीरीजच्या माध्यमातून संस्कृतीचा अपमान होतो'
आमचा बराच पैसा त्यात खर्च झाला आहे. माझ्याकडे जे पैसे आले आहेत ते आईवर उपचार करण्यासाठी असेही अनूपा यांनी सांगितले. अनुपा यांच्या कुटूंबात त्यांचे आईवडील, दोन लहान बहिणी आहेत.