
Anupam Kher injured: चित्रीकरणा दरम्यान अनुपम खेर यांना गंभीर दुखापत..
बॉलीवुड अभिनेते अनुपम खेर यांचा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेयर करत माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, त्यांच्या आगामी 'विजय 69' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या खांद्याला गंभीर इजा झाली आहे.
(Anupam Kher injured on Vijay 69 set)
या संदर्भात अनुपम यांनी पोस्ट शेयर केली आहे, त्यात ते म्हणतात... '' तुम्ही स्पॉटर्स फिल्म करत असाल आणि तुम्हाला अपघात होणार नाही.. असं कसं शक्य आहे. काल 'विजय 69' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान माझ्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.'
या दुखापतीमुळे दुखणं आहेच पण जेव्हा खांद्याला sling लावणाऱ्या माणसाने सांगितले की हा बेल्ट लावला तर दुखणं कमी होईल, आणि तसं जाणवलंही. पण जरासा खोकला जरी आला तर इतकं दुखतय की आपसूक तोंडातून किंचाळ्या बाहेर पडतात.
पण फोटोमध्ये मी जाणीवपूर्वक हसण्याचा प्रयत्न केला आहे. एक दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चित्रीकरण पुन्हा सुरू होईल. जेव्हा हे आईला समजलं तेव्हा ती म्हणाली, '' अजून दाखव जगाला तुझी बॉडी.. तुला नजर लागली कुणाची तरी..''
''त्यावर मी म्हणालो, आई.. गिरते है शहसवार ही मैदान ए जंग में। वो तिफल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले!.. हा शेर ऐकवताच आई फक्त कानाखाली मारता मारता थांबली..'' अशी पोस्ट अनुपम यांनी शेयर करत आपल्या अपघाताची माहिती दिली आहे.