
Anupam Kher: अपेक्षाच नव्हती, हे लोक तर.. म्हणत अनुपम खेरनी फिल्मफेयरची इज्जतच काढली
Anupam Kher Tweet About Filmfare News: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत फिल्मफेयर हा मोठा सोहळा मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कारांचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 करण्यात आले.
(anupam kher lashes out filmfare awards for not got any awards for the kashmir files vivek agnihotri)
या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळाला. 19 मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याच फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स सिनेमाला ७ नॉमिनेशन्स होती. पण एकही कॅटेगरीत द काश्मीर फाईल्स सिनेमाला पुरस्कार मिळवता आला नाही
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. यात अनुपम खेर यांनी सूचक विधान केलंय जे चर्चेत आहे. अनुपम खेर यांनी कोणाचंही नाव न घेता एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात अनुपम खेर लिहितात.."इज्जत एक मेहंगा तोहफा है.. इसकी उम्मीद सस्ते लोगो से ना रखे.." अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे. याचा अर्थ, आपली इज्जत खूप मोलाची आहे. छोट्या विचारसरणीच्या लोकांकडून सन्मानाची अपेक्षा ठेवू नये.
द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 बॉयकॉट केले होते. "मी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही", असं स्पष्टपणे विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं आहे. याशिवाय 'गंगूबाई काठियावाड़ी', 'ब्रह्मास्त्र', 'भूल भुलैया 2', 'बधाई हो 2' , आणि 'ऊंचाई' अशा सिनेमांसोबत बेस्ट सिनेमाच्या रेसमध्ये द काश्मीर फाईल्स होता. याशिवाय आणखी ६ नामांकनं सिनेमाला होती. परंतु फिल्मफेयर सोहळ्याआधी केलेल्या टीकेमुळे विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स सिनेमाला एकही पुरस्कार मिळालं नाही, अशी चर्चा आहे. फिल्मफेयर न मिळाल्याने अनुपम खेर मात्र नाराज झालेले दिसत आहेत