Satish Kaushik: "जा तुला माफ केलं.." मित्राचं आवडतं गाणं लावत Anupam Kher यांनी वाहिली शेवटची श्रद्धांजली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik, satish kaushik death, satish kaushik death news, anupam kher, anupam kher news

Satish Kaushik: "जा तुला माफ केलं.." मित्राचं आवडतं गाणं लावत Anupam Kher यांनी वाहिली शेवटची श्रद्धांजली..

Anupam Kher Emotional Post About Satish Kaushik: बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 9 मार्चला निधन झाले. वयाच्या 66 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आदल्या दिवशी आनंदात होळी खेळलेल्या सतीश यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली.

अजूनही सतीश कौशिक हे जग सोडून गेलेत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. सतीश यांच्या जाण्याने त्यांचे बेस्ट फ्रेंड अनुपम खेर यांना जबर धक्का बसलाय.

(Anupam Kher last tribute to satish kaushik by playing his friend's favorite song)

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची प्रार्थना सभा नुकतीच झाली. तेव्हा लाडक्या मित्राच्या आठवणीत अनुपम खेर हळवे झाले.

सतीश यांच्या तसबिरीवर फुलं वाहतानाचा अनुपम खेर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओमागे अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांचं आवडतं गाणं दो लफ्जो कि है दिल कि कहानी हे आवडतं गाणं लावलंय.

हा भावनिक व्हिडिओ शेयर करत अनुपम खेर लिहितात.. जा!!! तुला क्षमा केले! मला एकटे सोडण्यासाठी !!.. लोकांच्या हसण्यात मी तुला नक्कीच शोधात राहील!

पण रोज मी आपली मैत्री मिस करतोय!! गुड बाय माझ्या मित्रा! बॅकग्राऊंडला तुझं आवडतं गाणं लावलंय.. तुलाही हे आठवेल!! अशा शब्दात अनुपम खेर यांनी मित्र सतीश कौशिकला श्रद्धांजली वाहिली आहे.

सतिश यांचे जाणे हे अजूनही अनेकांना मान्य नाही. त्याचं अचानक असं सोडून जाणं हे त्यांच्या कुटुंबासाठी धक्काच आहे. त्याचबरोबर त्यांचा मित्र आणि चाहता परिवारही खुप मोठा होता. सतीश कौशिक यांच्या निधनाने प्रत्येकजण दु:खी झाला आहे.

अभिनेता अनुपम खेर देखील आपल्या सर्वात खास मित्राला निरोप देण्याचे दु:ख विसरू शकत नाही. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांची पत्नी शशी कौशिक यांना शोकपत्र पाठवले होते.

अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. सच्चा मित्र गमावणे म्हणजे काय असतं याचा अनुभव अनुपम खेर घेत आहेत.