Anupam Kher: अनुपम खेर पुण्यातील भीमाशंकर मंदिरात, अभिषेक करून केली शंकराची आराधना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anupam kher, anupam kher news, bhimashankar, pune, the kashmir files, vivek agnihotri, filmfare 2023

Anupam Kher: अनुपम खेर पुण्यातील भीमाशंकर मंदिरात, अभिषेक करून केली शंकराची आराधना

Anupam Kher News: अनुपम खेर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अनुपम खेर अनेकदा विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. अनुपम खेर पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्यामागे एक खास कारण आहे.

अनुपम खेर यांनी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे दर्शन झालं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला अभिनेता अनुपम खेर यांनी शिवलिंगावर शिवजलाभिषेक करत दर्शन घेतलं

(Anupam Kher performed Abhishekam at Bhimashankar temple in Pune and worshiped Lord Shankar)

यावेळी श्री क्षेत्र भिमाशंकर येथील होत असलेल्या कॉरिडॉर,मंदिर परिसराच्या विकास कामांची पहाणीही त्यांनी केली दरम्यान भिमाशंकर देवस्थानकडुन खेर यांनी सन्मानित करण्यात आले.. अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात.

रविवारी अर्थात ३० एप्रिल रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानी जात अभिनेता अनुपम खेर यांनी शिवलिंगावर शिवजलाभिषेक करत दर्शन घेतलं.

यावेळी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे होत असलेल्या कॉरिडॉर, मंदिर परिसराच्या विकास कामांची पहाणी सुद्धा त्यांनी केली.

दरम्यान भिमाशंकर देवस्थानाकडुन खेर यांना सन्मानित देखील करण्यात आले.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. यात अनुपम खेर यांनी सूचक विधान केलंय जे चर्चेत आहे. अनुपम खेर यांनी कोणाचंही नाव न घेता एक पोस्ट लिहिली आहे.

ज्यात अनुपम खेर लिहितात.."इज्जत एक मेहंगा तोहफा है.. इसकी उम्मीद सस्ते लोगो से ना रखे.." अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे.

याचा अर्थ, आपली इज्जत खूप मोलाची आहे. छोट्या विचारसरणीच्या लोकांकडून सन्मानाची अपेक्षा ठेवू नये.

अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. अनुपम खेर गेल्या वर्षी द काश्मीर फाईल्स या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय उंचाई, शिवशास्त्री बलबोवा अशा सिनेमात अनुपम खेर दिसले.

टॅग्स :anupam kher