
'विरोध करणारे तेच चेहरे आहेत ज्यांनी काश्मीर फाईल्स'ला पण...',अनुपम खेर संतापले
The Kerala Story या चित्रपटाला प्रदर्शित होवुन चार दिवस झाले असले तरी या चित्रपटावरुन वाद कमी होण्याचा नाव घेत नाही.
मनोरंजन विश्वाबरोबरच राजकिय वातावरण देखील चांगलच तापलं आहे. एकीकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांच्या सरकारने हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल सरकारने यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
अनेकांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यातच काश्मीर फाईल्समध्ये अभिनय करणारे अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
द काश्मीर फाईल्य दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी देखील 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती आणि विरोध करणाऱ्यांवर जोरदार टिकाही केली होती.
त्यातच आता अनुपम खेर यांच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मिडियावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. अनुपम खेर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या चित्रपटाला विरोध करणारे तेच लोक आहेत ज्यांनी माझ्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाविरोधात आवाज उठवला होता.
अनुपम खेर म्हणाले की, 'मी पुन्हा सांगतोय की हे तेच लोक आहेत. मी अद्याप हा चित्रपट पहिलेला नाही. पण मी आनंदी आहे की लोक असे चित्रपट तयार करत आहेत जे सत्य घटनेच्या जवळपास आहे. ज्यांना वाटतं की हा चित्रपट प्रोपगंडा आहे. ते त्यांच्या आवडीच्या विषयावर चित्रपट बनवण्यास मोकळे आहेत. त्यांना कोणीही अडवलेलं नाही.'
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत ही असाच वाद झाला होता. ज्यात अनुपम खेर मुख्य भुमिकेत दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याने 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.
द केरळ स्टोरीच्या कमाईचा आकडा पाहिल्यानंतरही तसचं काहीसं चित्र दिसत आहे. हा चित्रपट देखील लवकरच नवीन विक्रम तयार करेल असं दिसत आहे.
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून आत्ता प्रर्यंत या चित्रपटाने 45.75 कोटींची कमाई झाली आहे.
तर या चित्रपटात 'द केरळ स्टोरी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींबद्दल सांगायच झालं तर द केरळ स्टोरीमधील कलाकार अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्दी इदनानी यांनी दमदार भूमिका केल्या आहेत.