एवढ्या मोठ्या कलाकाराला कुणीच ओळखलं नाही, व्हिडिओ व्हायरल

त्यांनी याविषयी सोशल मीडियावर (social media) माहिती दिली आहे.
actor anupam kher
actor anupam kher Team esakal

मुंबई - आपण नेहमीच असं पाहिलं आहे की, जेव्हा कुणी एखादा सेलिब्रेटी बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा (bollywood celebrity) असतो. मात्र अनेकदा हा प्रकार वेगळ्या असल्याचेही दिसून येते. असाच एक गंमतीशीर प्रसंग बॉलीवूडमधील प्रख्यात कलाकार अनुपम खेर (anupam kher) यांच्या बाबत घडला आहे. त्यांनी याविषयी सोशल मीडियावर (social media) माहिती दिली आहे. चाहत्यांनाही त्यांची ही पोस्ट आवडली आहे. (anupam kher share video of a himachal resident who did not recognize)

अनुपम यांनी त्या व्हिडिओला रियॅलिटी चेक (reality check) असे लिहिले आहे. तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी म्हटले आहे, मी नेहमीच गर्वानं असं सांगतो की मी 518 चित्रपट केले. आणि मला आता लोकं ओळखत असतील, पण तरीही मला कुणीच ओळखलं नाही. मात्र ज्ञानचंद यांनी मोठ्या निरागसतेनं माझं गर्वहरण केलं. त्याचं मला नवल वाटलं. त्यांना माहिती नव्हतं की मी कोण आहे. मात्र जे काही झालं ते माझ्यासाठी खूप काही नवीन होतं. मला खूप काही शिकवणारं होतं. या शब्दांत खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्या व्हिडिओमध्ये अनुमप खेर शिमल्या मधील काही ठिकाणी भटकंती करताना दिसत आहेत. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पड़ले होते. त्यावेळी त्यांची भेट ज्ञानचंद नावाच्या एका व्यक्तीशी झाली. त्यावेळी अनुपम यांनी त्यांना आपली ओळख सांगितली.

actor anupam kher
राखी सावंतकडून चुकून 'खतरों के खिलाडी 11'च्या विजेत्याचं नाव जाहीर

आपल्या चेह-यावरील मास्कही त्यांनी हटवला. मात्र त्या व्यक्तीनं अनुपम यांना ओळखले नाही. त्यावेळी अनुपम यांनी आपल्या शैलीमध्ये असं म्हटलं की, आता मला पेलाभर पाण्यात उडी मारण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com