अनुपम खेर यांचं कोरोना सॉंग चर्चेत!Anupam Kher | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher

अनुपम खेर यांचं कोरोना सॉंग चर्चेत!

अनुपम खेर(Anupam Kher) अनेकदा त्यांच्या व्हिडिओंद्वारे लोकांशी जोडलेले राहतात. नुकतेच त्यांनी एक असा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. कोरोनाच्या या काळात त्यांची ही फनी स्टाइल थोडंसं का होईना टेन्शन दूर करेल एवढं मात्र नक्की. आपण सध्या ज्या कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचा सामना करत आहोत त्या परिस्थितीला अनुरूप अनुपम खेर यांनी 'जरा सी आहट होती है ' हे जुने गाणे ट्वीट केले आहे.

त्‍यांनी त्‍यांच्‍या 'फेसबुक पेजवर' लता मंगेशकर यांच्या आवाजाातील एका जुन्या गाण्याचं नवीन व्हर्जन गाऊन व्हिडिओ देखील पोस्‍ट केला आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांनाही पुन्हा संसर्ग होत असल्याची आठवण करून देत, अनुपम खेर यांनी सर्वांना 'मास्क अप' करण्याचे आवाहन केले. व्हिडिओमध्ये अनुपम गातायत, "जरा सी खरखराहट होती है। तो दिल सोचता है कही ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नही (घशात थोडीशी खरखर झाली तरीही मला भीती वाटते). व्हिडिओ शेअर करताना अनुपमने लिहिले, "दोन लसीकरणानंतरही!! #MaskUp #SafeDistance #MaskUpIndia #Omicron." धर्मेंद्र आणि बलराज साहनी यांच्या 1964 मध्ये आलेल्या हकीकत या चित्रपटातील हे गाणे आहे.

हेही वाचा: आराध्या बच्चनचा ख्रिसमस डान्स तुफान व्हायरल...

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना याची लागण झालेली आहे. अनुपम खैरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते लवकरच विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. अनुपम खेर यांचा 'उंचाई ' हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा, अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी देखील दिसणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top